Collection: स्वर्णिका - Swarnika Bugadi

हा कर्नाटकातील अलंकार.  बुगडी (बुगुडी) हा शब्दही कानडी भाषेमधलाच आहे. कानाच्या पाळीमध्ये अगदी वरच्या बाजूला हा अलंकार घातला जातो. महाराष्ट्रात तो आजही अत्यंत लोकप्रिय अलंकार असून ग्रामीण भागात, तर तो अधिकतेने वापरात आहे. कर्नाटकात बुगडीला 'सौभाग्यचिन्ह' म्हणून विशेष मान आहे. महाराष्ट्रात मात्र ही प्रथा नाही.