Collection: स्वर्णिका - Kudi

कुडी हे स्त्रियांचे कानात घालण्याचे पारंपारिक दागिना आहे. कुड्या या मोत्यांच्या, रत्नमण्यांच्या वा केवळ सोन्याच्या मण्यांच्या, अशा विविध प्रकारच्या असतात . कुड्यांचा आकार गोल असतो आणि त्यात ७ मणी एकत्र बांधलेले असतात, ज्यामुळे त्याला फुलासारखा नाजूक आणि सुंदर आकार मिळतो. या दागिन्याचे डिझाइन साधे असूनही अत्यंत आकर्षक असते, ज्यामुळे ते पारंपारिक पोशाखासोबत घालण्यासाठी उत्तम मानले जाते. कुड्यांची रचना खास करून ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांमध्ये लोकप्रिय असून त्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे.